चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह: स्वातंत्र्यलढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ
चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात …